Pune Street Walk Day | पुण्यातील रस्त्यांवर रविवारी पादचाऱ्यांचे ‘राज्य’; सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ‘पादचारी दिना’निमित्त वाहनांना प्रवेशबंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पादचाऱ्यांना अडथळामुक्त चालण्याचा आस्वाद घेता यावा, या हेतूने पुणे महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या ‘पादचारी दिन’ (Pune Street Walk Day) उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय महापालिकेच्या पथ विभागाने घेतला. त्यानुसार येत्या रविवारी (दि. 11 डिसेंबर) लक्ष्मी रस्त्यासह शहरातील 21 रस्त्यांवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत वाहनमुक्त ठेवण्यात येणार आहे. तसेच शहरातील अनेक रस्तेदेखील वाहतुकीसाठी (Pune Street Walk Day) बंद राहणार आहेत.

या रस्त्यांवर विविध ठिकाणी वॉकिंग प्लाझा आणि स्थानिक गटांच्या सहकार्याने मनोरंजक आणि संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पादचारी दिन (Pune Street Walk Day) साजरा करणारी पुणे ही देशातील एकमेव महापालिका आहे. त्यानुसार महापालिकेकडून दरवर्षी 11 डिसेंबर रोजी पादचारी दिन राबवला जातो. पादचाऱ्यांना मुक्त संचार करता यावा, वाहनांमुळे होणारी कोंडी आणि प्रदूषण कमी व्हावे, पादचारी मार्ग, सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्रॉसिंग आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवला जातो. वाहनांचा वाढता वापर नियंत्रित करण्यासाठीदेखील या उपक्रमातून जनजागृती आणि प्रोत्साहन दिले जाते.

कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार –

लक्ष्मी रस्ता (उंबऱ्या गणपती ते गरुड गणपती)
लाल बहादूर शास्त्री रस्ता,
बिबवेवाडी रस्ता (रम्यनगरी ते पुष्पमंगल कार्यालय)
सहकारनगर रस्ता (गजानन महाराज मठ ते पंचमी हॉटेल)
वानवडी (जगताप चौक ते जांभूळकर चौक)
लुल्लानगर ते गंगाधाम चौक
हडपसर-महंमदवाडी रस्ता (रहेजा सर्कल ते विबग्योर स्कूल)
सासवड रस्ता (गाडीतळ ते गोंधळेनगर)
जंगली महाराज रस्ता
पाषाण सूस रस्ता
मयूर कॉलनी
सिटी प्राइड थिएटर कोथरूड
कर्वे रस्ता (शेलारमामा चौक ते सावरकर स्मारक पौड फाटा ते डहाणूकर कॉलनी)
खराडी दक्षिण मुख्य रस्ता
509 चौक ते विश्रांतवाडी
बॉम्बे सॅपर्स ते विश्रांतवाडी

Web Title :- Pune Street Walk Day | Pedestrians on Pune’s roads on Sunday; Entry ban for vehicles from 11 am to 4 pm on the occasion of ‘pedestrian day’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले यांचा भाजपबाबत नरमाईचा सूर

Teachers Exam | शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं आता शिक्षकांचीच परीक्षा होणार, विभागीय आयुक्तांचा निर्णय

Sushma Andhare | ‘भाजप माझी हत्या करणार आहे का?’ – सुषमा अंधारे