Pune : पुण्यात दुपारी 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी ! उद्याने, मॉल्स, थिएटर, जीम अशी गर्दीची ठिकाणे बंदच राहाणार; जाणून घ्या सविस्तर

पुणे – सर्व पुणेकर आणि प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे दुसरी कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यास यश आले आहे. परंतू कोरोना अद्याप गेलेला नाही, याचे भान राखून राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ जून अर्थात उद्यापासून टप्प्याटप्प्याने जनजीवन पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी ‘अनलॉक’ (unlock) प्रक्रिया सुरू करत आहोत. लॉकडाउन (Strict curfew) दरम्यान बंद असलेली अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून अत्यावश्यक सेवेतील दुकाने मात्र पुर्ण आठवडाभर सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू राहातील. दुपारी ३ वाजल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी ७ पर्यंतचे संचारबंदीचे (Strict curfew) निर्बंध पुढील दहा दिवस लॉकडाउन ( Strict curfew) नुसार कडकच राहातील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, की १८ एप्रिल रोजी पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या ५६ हजार ६०० होती. ती आज ६ हजारांपर्यंत कमी झाली असून दररोज आढळणार्‍या रुग्णसंख्येचा दरही ६ टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेच्या हद्दीतील लॉकडाउन शिथिल करण्यासंदर्भात प्रशासनातील अधिकार्‍यांसोबत आज बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये लॉकडाउन दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ही दुकाने उद्यापासून सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी ७ ते १२ या वेळेत सुरू राहातील. अत्यावश्यक सेवेची दुकाने मात्र सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते १२ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास कारणीभूत ठरणारी गर्दीच्या ठिकाणांवरील बंधने यापुढेही काही कालावधीसाठी कायम राहातील. यामध्ये उद्याने, मैदाने, मॉल्स, जीम, चित्रपटगृह, नाट्यगृहे मंदिरे, सार्वजनिक वाहतूक पीएमपीएमएल आदी ठिकाणांचा आणि सेवांचा समावेश आहे. १० जून रोजी परिस्थितीचा आढावा घेउन पुढील निर्णय घेण्यात येईल. याप्रसंगी उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृहनेते गणेश बिडकर उपस्थित होते.

एकजुटीने लाट थोपविली, तिसरी लाट रोखण्यसाठी एकजुटीचे आवाहन

साधारण ४५ दिवसांत पुण्यातील ऍक्टीव्ह कोरोना रुग्णसंख्या ५० हजारांनी कमी झाली आहे. वैद्यकीय स्टाफ, सर्व राजकिय पक्ष आणि संघटना , शासकिय आणि महापालिकेची यंत्रणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नागरिकांची साथ यामुळेच ही लाट आटोक्यात आली आहे. परंतू अद्याप कोरोना ठाण मांडून असल्याने सर्वांना कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सामुहीक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत करतानाच कोरोना पुन्हा डोकेवर काढणार नाही, यासाठी सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी कोरोनाशी संबधित सुरक्षिततेचे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना राज्य शासनाने एप्रिलमध्ये लॉकडाउनचा निर्णय घेतला. त्यावेळी भाजपचे शहरअध्यक्ष जगदीश मुळीक आणि खासदार गिरीश बापट यांनी सर्वसामान्यांसाठी पीएमपीएमएल सेवा सुरू ठेवावी यासाठी पीएमपीच्या स्वारगेट येथील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. पोलिसांनी या दोघांसह काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले होते. परंतू आता भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेने अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर पीएमपी सेवा बंदच ठेवली आहे याबाबत विचारले असता महापौर मोहोळ यांनी लॉकडाउन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी पीएमपी सेवा सुरूच होती व यापुढेही सुरूच राहील, असे माफक उत्तर देत मूळ प्रश्‍नाला बगल दिली.

असे असेल अनलॉक…

* अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने (उदा. कपडे, दागिने, फर्निचर, इलेक्ट्रीकल साहित्य आदी.) सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ या वेळेत सुरू राहातील.

* अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने (उदा.डेअरी, बेकरी, मेडीकल्स, कृषि संदर्भातील सर्व दुकाने, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने) संपुर्ण आठवडा सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहातील.

*मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते २ पर्यंत उघडी राहातील.

* महानगरपालिका क्षेत्रात्रील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहातील.

* रेस्टॉरंट व बार फक्त पार्सल सेवेसाठी सुरू राहातील.

* ई कॉमर्स मार्फत (ऑनलाईन शॉपिंग) अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची सेवा सुरू राहील.

* दुपारी ३ वाजल्यानंतर वैद्यकीय व अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त संचारबंदी कायम राहाणार असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.

* पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शासकिय कार्यालयांमध्ये २५ टक्के अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहाण्यास परवानगी राहील.

 

Also Read This : 

Pune : शिवाजीनगर न्यायालयातील वकिलास महिलेकडून 10 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

 

जाणून घ्या ‘चम्पी’ करण्याची पध्दत, केस होतील ‘लांब’ अन् ‘दाट’, जाणून घ्या

 

आईला न सांभाळणारे तिघे अटकेत

 

तुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी

 

EPFO च्या नियमांमध्ये बदल ! कोरोनाच्या उपचारासाठी सुद्धा PF मधून काढू शकता पैसे, जाणून घ्या डिटेल्स

Beauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या