Pune : कडक Lockdown ! ‘रविवार होता तरी तो पोलिसांना म्हणाला – ‘मी बँकेत पैसे भरायला जातोय’, व्हिडीओ होतोय सोशलवर व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात कडक लॉकडाऊन आहे, पण रस्त्यावरची गर्दी काही कमी होताना दिसत नसल्याचे पाहिला मिळत आहे. पोलीस 24 तास ऑन ड्युटी  आहेत, ते पूर्ण प्रयत्न करत आहेत; पण, बाहेर पडत असलेल्या नागरिकांना विचारपूस केल्यानंतर त्यांच्याकरुन गमंतीशीर अन मजेशीर उत्तरे मिळत असल्याचा अनुभव येत आहे. त्याचीच एक झलक पुणे पोलिसांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आहे. हे ऐकून तुम्हा आम्हाला हसू आवरणार नाही, पण शहरात कोरोना का आटोक्यात येत नाही, तेदेखील कळून जाईल आणि आपण किती कडक लॉकडाऊन पालन करतो हेही समजेल.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा आवाहन करत विनाकारण बाहेर पडू नये, असे सांगितले आहे.