ताज्या बातम्यापुणे

Pune : पुण्यात शनिवार आणि रविवार कडक Lockdown ! किराणा, भाजी, फळांची दुकाने बंद राहणार; मेडिकल अन् दूध सेवा सुरू, विनाकारण रस्त्याने फिरणार्‍यांची वाहने जप्त होणार (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याच्या यापार्श्वभूमीवर मेडिकल सेवा (24 तास) व दूध सेवा (सकाळी 11 वाजेपर्यंत फक्त) सोडून इतर सर्व आस्थापना (किराणा दुकाने, भाजी विक्रीची दुकाने, फळ विक्रीचे दुकाने आणि इतर) बंद ठेवत विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार आहेत. विनाकारण रस्त्याने फिरणार्‍यांची वाहने जप्त केली जाणार आहेत तर त्यांच्यावर खटले दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती पुण्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

शहरात शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन पाळला जात आहे. पण, या विकेंड लॉकडाऊनबाबत पुणेकरांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. काही ठिकाणी किराणा व इतर दुकाने सुरू असल्याचे कळते. तर नागरिक देखील बाहेर दिसत आहेत. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी या विकेंड लॉकडाऊन बाबत स्पष्टता आणत शहरात केवळ मेडिकल (24 Hours) व दुध (upto 11am) या दोनच अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे सांगितले आहे. त्याव्यतिरिक्त कोणतीही सेवा शहरात या दोन दिवसांच्या काळात सुरू नसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. दूध सेवा सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर त्याही बंद असणार आहेत.

Back to top button