पुणे : महाविद्याालयाच्या आवारात टेम्पोने दिलेल्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बिबवेवाडी येथील विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्सच्या आवारात टेम्पोने दिलेल्या धडकेत विद्याार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाविद्याालयाच्या आवारात विद्याार्थ्यांकडून निदर्शने करण्यात आली.

ऐश्वर्या संतोष धांडेकर (वय १९,रा. कोंढवा) असे मृत्यू झालेल्या विद्याार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

ऐश्वर्या बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. सध्या त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, असे ऐश्वर्याचे मामा अमित जाधव यांनी सांगितले.

२१ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याची आई दीपाली यांनी तिला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास महाविद्याालायाच्या प्रवेशद्वारात सोडले. त्यानंतर आवारात एका टेम्पोने तिला धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला. दरम्यान, तिला खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आम्हाला मिळाली. उपचारादरम्यान, तिचा सोमवारी (२ डिसेंबर) मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर महाविद्याालयीन प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. खासगी टेम्पोचालक महाविद्याालयाच्या आवारात कसा आला?, महाविद्याालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाहीत. त्यामुळे पसार झालेल्या टेम्पोचालकाची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. ही घटना दुर्देवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे, असे जाधव यांनी सांगितले.

महाविद्याालयाने उडवाउडवीची उत्तरे दिली. आम्ही चौकशी केली असता संबंधित टेम्पोतून वसतीगृहातील विद्याार्थ्यांना जेवणाचे डबे आणण्यात आले होते, अशी माहिती मिळाली. ऐश्वर्याच्या मागे आई-वडिल, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान बुधवारी महाविद्याालयाच्या आवारात मोर्चा काढण्यात आला तसेच विद्याार्थ्यांनी यावेळी निदर्शने केली.

Visit : policenama.com