पेशवाईतील पोशाखात पदवीदान समारंभ ; पुणे विद्यापीठात गदारोळ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे कुलगुरू झाल्यापासून विद्यापीठात खुळचट संकल्पना राबवण्यासाठी उत्तेजन मिळू लागले आहे. पदवी प्रदान कार्यक्रमाचा ड्रेसकोड बदलून पेशवाईचा पोशाख करण्याचा प्रताप पुणे विद्यापीठाने केला आहे. माणसाने परंपरावादी असण्याला हि काही मर्यादा असतात पण पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असे करून नेमके काय साध्य करू पाहत आहेत याचे उत्तर तेच देऊ शकतात.

पदवी प्रदान समारंभ सुरु असताना काही विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी सभामंडपात घोषणा देऊ लागले. या घोषणातून कुलगुरू नितीन करमळकर यांना केंद्रित केले गेले आणि या बदललेल्या पोशाखाचा निषेद करण्यात आला. घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीसांनी अटक करून कार्यक्रम स्थळावरून दूर केले. तर विद्यार्थ्यांच्या या कृतीमुळे विद्यापीठाचे वातावरण मात्र चांगलेच दूषित झाले होते. कार्यक्रमाच्या सभामंडपात गदारोळ माजल्याने उपस्थितीमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. पुणे विद्यापीठाने या वर्षी पदवीदान समारंभाचा ड्रेसकोड बदलून पांढऱ्या रंगाचा पायजमा आणि क्रीम कलरचा झब्बा उपरणे आणि पुणेरी पगडी असा पोशाख करण्यात आला आहे. तर या बदललेल्या पोशाखाला लोकतांत्रिक जनता दल, एनएसयुआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड या संघटनांनी विरोध केला आहे.

पदवी ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र मागील वर्षीचा जुनाच पोशाख करून पदवी ग्रहण करणे पसंत केले आहे. विद्यार्थ्यांनी हि विद्यापीठाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकरांची हिमालयात वाढणाऱ्या खडकांच्या नमुन्यावर पीएचडी आहे विज्ञानवादाचे उच्च विद्या विभूषित असणाऱ्या कुलगुरूंनी अशा पद्धतीने निर्णय घेतल्यावर त्यांच्या विद्यावाचाळते वर हि प्रश्नचिन्ह उभे राहते. पुरुषांची आणि महिलांची पगडी देखील वेगवेगळी असल्याने पुन्हा स्त्री-पुरुष भेदाचा कुलगुरूंच्या मनोदय आहे का असा हि प्रश्न सामान्य लोकांकडून उपस्थित केला जातो आहे.