Pune : वडिल आजारी पडल्यानंतर त्यानं घेतले पैसे उसणे, त्याबदल्यात जमीन बळकावण्याची धमकी मिळाल्यानं प्रौढानं केली आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  वडिल आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी उसने पैसे घेतल्यानंतर त्याबदल्यात जमीन बळकावत धमक्या दिल्याने एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती.

याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

सचिन बबन गलांडे (वय ४५, रा. वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अनिल बापू कामठे (वय ३६,रा. भेकराईनगर, फुरसुंगी) याला अटक केली आहे. सचिन यांचे भाऊ संतोष यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सचिन गलांडे यांचे वडिल आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी अनिल कामठे याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. दरम्यान गलांडे यांच्या आईच्या नावावर फुरसुंगी येथे पाच गुंठे जागा आहे. ही जागा कामठे याने बळकावली व त्याबाबत कल्पना न देताच जागा परस्पर इतरांना विकली.

हा प्रकार समजताच गलांडे यांनी कामठेकडे विचारणा केली. तेव्हा कामठेने त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. सततच्या धमक्या व मानसिक त्रासामुळे गलांडे यांनी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. गलांडे बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. दरम्यान, गलांडे यांचा मृतदेह नदीपात्रात सापडला. पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल करत अटक केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जाधव करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like