Police Suicide News | दुर्देवी ! कर्जबाजारीपणातून तरूण पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑलनाइन – Police Suicide News | कर्जबाजारीपणाला कंटाळून पोलिस (Maharashtra Police) कर्मचार्‍यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. मुंबईतील एका पोलिस कर्मचार्‍यानं (Mumbai Police) राहत्या घरी आत्महत्या (Suicide Of Young Police) केली आहे. निखिल गौतम साबळे (Nikhil Gutam Sable) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचं नाव आहे. साबळे हे मुळचे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा (karmala) तालुक्यातील रहिवासी होते. (Police Suicide News)

साबळे यांनी अ‍ॅक्सिस बँकेकडून कर्ज (Loan Of Axis Bank) घेतले होते. त्याचे हप्ते भरण्यासाठी ते असमर्थ ठरले. आर्थिक परिस्थितीमुळे ते नैराश्येत होते. त्यामधूनच त्यांनी शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास राहत्या खोलीत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येबाबत त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आले आहे. याबाबत कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात (Kanjurmarg Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साबळे हे कांजूरमार्ग येथील कर्वेनगर परिसरात रहावयास होते. त्यांच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Web Title :- Pune Suicide News | Mumbai Kanjurmarg Solapur Karmala Police Nikhil Gutam Sable Suicide News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा