पुण्यात नैराश्यातून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – नैराश्यातून एका तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान शहरातील आत्महत्येचे सत्र थांबत नसून लॉकडाऊन काळात आलेले नैराश्य आणि तणावातून या घटना घडत आहेत.

संध्याराणी मुरलीधर चापलवाड (वय 27, रा. यशोदीप सोसा, चैतन्य चौक, वारजे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याराणी यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्या ब्युटीशियन असून एका ठिकाणी काम करत. परंतु लॉकडाऊनमुळे मागील काही महिन्यापासून काम नसल्याने त्या नैराश्यात होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास त्यांच्या आई कामावरुन परत घरी आल्यावर त्यांना घरात संध्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानी तात्काळ पोलिसांना यघटनेची माहिती दिली. त्यावेळी वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. तर चौकशी सुरू केली आहे. दरम्यान घरात कुठलीच चिठ्ठी आढळली नाही. वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like