पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या कारवाईचा धडाका सुरूच, पण…

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –   “पोलीस दल हीच माझी ताकद आहे”. याच ताकदीवर जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी, अवैध धंदे ,काळे धंदे मोडून काढण्यासाठी पोलिसांचा संघ तयार करुन याच पोलिससंघाच्या माध्यमातून गुन्हेगारी व काळे धंदे मोडून काढणार आहोत असे सांगणारे डाॕ. अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या अधिक्षक पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.पुणे ग्रामीणचा पदभार स्वीकारताच डॉ. देशमुख यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे.सुरुवातीला त्यांनी दौंड येथील गुंडाला मोक्का अंतर्गत कारवाई करत तडीपार केले आहे तर शिक्रापूर येथे सुमारे ४१ लाख रुपयांचा गुटखा पकडून जिल्ह्यात मोठी कारवाई करत खळबळ उडवून दिली आहे.अनेक फरार आरोपीच्या मुसक्या देखील आवळल्यात.तर जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलिस स्टेशनमध्ये छोट्या-मोठ्या अवैध धंद्यावर देखील कारवाई सुरू झाली आहे.त्यामुळे डाॕ.अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात पाऊल ठेवतात अवैध धंदे , दोन नंबरवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.अभिनव देशमुख हे शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांनी कोल्हापूर येथे कार्यरत असताना कामात कुचराई, बेशिस्तपणा, गैरवर्तन, निष्काळजीपणा, नियमांचा भंग करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली होती तर पोलीस खात्यातील काही हप्ता बहाद्दरांना देखील वेळेत घरी बसवले होते.तसेच अवैद्य धंद्यावर आळा घालण्यासाठी ते परिचित असुन पोलिस खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात.

तर चांगले काम करणाऱ्याच्या पाठिशीही उभे राहतात,वेळोवेळी शाबासकीची थाप देखील देतात. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी जरी आपल्या कामाचा धडाका लावला असला तरी त्यांना जिल्ह्यातील स्थानिक पोलिस स्टेशन मधून सहकार्य मिळणे अपेक्षित आहे.हे सहकार्य मिळण्यासाठी पोलीस अधीक्षकांना सर्व पोलीस स्टेशनच्या “त्या” चार ते पाच कर्मचाऱ्यांचे खांदेपालट करत चौकशी करणे गरजेचे आहे.”त्या” ठराविक कर्मचाऱ्यांचा पोलिस स्टेशन मध्ये “त्या”कामाशिवाय दुसरे कुठलेही काम नसते हे कर्मचारी फक्त आणि फक्त” त्या” कामात व्यस्त असतात.त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेउन त्याचे खांदेपालट करत या कर्मचाऱ्यांवर वेगळी जबाबदारी देत पोलीस अधीक्षकांनी वेगळे पाऊल उचलल्यास नक्कीच पुणे जिल्ह्यातील अवैद्य धंदे हद्दपार करण्यासाठी त्यांना यश येईल.विशेष म्हणजे अशा कर्मचार्‍यांच्या आशीर्वादानेच सर्वञ अवैद्य धंदे चालू असल्याचे बोलले जाते.त्या “चार ते पाच” कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील काही वेळेस अंधारात ठेवले जाते.या अवैध धंद्यातुन पैशातून बेरोजगार तरुणांना पोसले जातात यामुळेच गुंडगिरी,मारामारी,भांडणे, छोटे-मोठया चोऱ्या या सारख्या गुन्हे करण्यास गुन्हेगार प्रवृत्त होत असतात.त्यामुळे प्रत्येक पोलिस स्टेशनचे संबंधित असणा-या “त्या” चार ते पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास जिल्हात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी,अवैध धंदे करणाऱ्याचा नायनाट होईल.अभिनव देशमुख हे “बाते कम काम जादा”या पद्धतीने काम करतात त्यामुळे जिल्ह्यात “त्या” चार ते पाच कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या मटका, क्लब,जुगार,दारू, वेश्याव्यवसाय,खाजगी सावकारी,तसेच पडद्याआड राहून गुंडगिरीला पाठबळ देणारे “पांढरपेशी” व्यक्तींना देखील कारवाई करत जेल मध्ये टाकतील अशा विश्वास पुणे जिल्हयातील नागरिक व्यक्त करत आहेत.