Pune : मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला अन् ठोंबरे टोळीचा मुख्य सुत्रधार सुरज ठोंबरला हैदराबाद येथून अटक; आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा केला होता प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा प्रयत्न करून परिसरात दहशत निर्माण करणार्‍या ठोंबरे (Thombre) टोळीच्या मुख्य सुत्रधार आणि मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेल्या सूरज अशोक ठोंबरे (Thombre) (22, रा. 260, धनगरवाडा, नाना पेठ) याला पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली आहे. त्याला तेलंगणामधील हैदराबादमधून अटक केल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयाने ठोंबरेला (Thombre) 5 दिवस पोलिस  कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आदित्य अमर उकरंडे (16, रा. नाना पेठ, डोके तालीम, पुणे) याने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जय शिवराय ! ग्रामपंचायती-जिल्हा परिषदांमध्ये 6 जूनला साजरा होणार शिवस्वराज दिन

यापुर्वी पोसिलांनी ओंकार गजानन कुडले (21, रा. 767, गणेश पेठ, बांबू आळी, महाराणा प्रताप जिम शेजारी), कानीफनाथ विनोद महापुरे (23, रा. नाना पेठ, डोके तालीम), राजन मंगेश काळभोर (22, रा. मोहननगर, धनकवडी), गोटया उर्फ नरसिंग भिमा माने (28, रा. तोरणा हौसिंग सोसायटी, हिंगणेमळा, ससाणेनगर, हडपसर) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड (36, रा. अशोक चौक, नाना पेठ) यांना अटक केली होती.

टोळीचा मुख्यसुत्रधार आणि अटक आरोपी सुजर ठोंबरे आणि सोमनाथ सयाजी गायकवाड यांनी आपआपसात कट करून इतर आरोपींना चिथावणी दिली होती.
त्याप्रमाणे आरोपींनी दि. 23 जानेवारी 2021 रोजी ते 26 फेब्रुवारी 2021 रोजी दरम्यान नाना पेठेतील डोके तालीमजवळ हातात कोयते फिरवून दहशत निर्माण केली.
आंदेकर टोळीला सूरज ठोंबरे याच्या बातम्या पुरवतो म्हणून आरोपींनी फिर्यादीला वेळोवळी धमकावले आणि खुनाचा प्रयत्न देखील केला.
आंदेकर टोळी आणि ठोंबरे यांच्यामध्ये भांडणे सुरू झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही टोळयावर कडक कारवाई करत गुन्हे दाखल केले होते.
त्यामध्ये आंदेकर टोळीतील आणि ठोंबरे टोळीतील अनेकांना अटक करण्यात आली होती.
मात्र, टोळीचा मुख्य सुत्रधार सूरज ठोंबरे हा फरार होता.
सदरील मोक्क्याच्या गुन्हयातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे यांनी एक विशेष पथक निर्माण केले होते.
ते पथक गेल्या काही दिवसांपासून ठोंबरेचा शोध घेत होते.
ठोंबरे हा तेलंगणामधील हैदराबाद येथे असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांना समजली होती.
त्यानंतर सदरील माहिती वरिष्ठांना देण्यात आली.

RBI ची 4 जूनला महत्वाची बैठक ! महागाई, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणेची शक्यता

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथकातील फरासखाना पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, समर्थ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक विशाल मोहिते, विशेष पथकातील पोलिस कर्मचारी शाम सुर्यवंशी, सागर केकाण, अमेय रसाळ, मोकाशी मेहबुब, तुषार खडके आणि मलिक्कार्जून स्वामी यांच्या पथकाने ठोंबरेला हैदराबाद येथुन अटक केली.

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात ठोंबरेला हजर केले असता त्याला 5 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर करत आहेत.
दरम्यान, सूरज ठोंबरे याच्याविरूध्द आतापर्यंत तब्बल 9 गंभीर गुन्हे दाखल असून त्यामध्ये 3 खुनाच्या प्रयत्नांचा समावेश आहे.

केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; जिल्हा व नागरी बँकांच्या अस्तित्वासाठी टास्क फोर्स