Pune : महर्षीनगरमधील सोसायटीमध्ये घरफोडी करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी पकडलं, हत्यारं जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरफोडी करणाऱ्या सराइत गुन्हेगाराच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी पकडले. महर्षीनगर भागातील एका सोसायटीत घरफोडी करण्याच्या तयारीत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून तीक्ष्ण शस्त्रे, कटावणी असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

अनिल सुनिल कांबळे (वय २४), अक्षय मनोज कांबळे (वय २६), हैदर रहिम मिर्झा (वय २६), शिवप्रसाद महादेव धेंडे (वय २४, सर्व रा. डायसप्लॉट, गुलटेकडी), अदित्य सुरेश पवार (वय १९,रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शहरात घरफोड्या व लुटमरीच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांना गस्त घालत हे घटना रोखण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान महर्षीनगर भागातील आनंद पार्क परिसरात एका सोसायटीत घरफोडी करण्याच्या तयारीत चोरट्यांची टोळी असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी तात्काळ टीमला घेऊन मध्यरात्री पोलिसांनी सापळा लावून पकडले. यावेळी एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. तर इतरांना पकडून झडती घेतली असता त्यांच्याजवळ तलवार, कटावणी, दांडके, दोरी असा मुद्देमाल जप्त केला. माहितीत ते या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.

वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, गुन्हे शाखेचे निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश जायभाय, सचिन कदम, रामचंद्र गुरव, पंढरीनाथ शिंदे, विजय कुंभार यांनी ही कारवाई केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like