Pune : स्वारगेट पोलिसांनी केली 100 CCTV फुटेजची पडताळणी, रिक्षात विसरलेले नगरसेविकेच्या मुलाचे 1.75 लाखाचे दागिने सापडले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – स्वारगेट पोलिसांनी तबल 100 सीसीटीव्ही पडताळणी करत रिक्षात विसरलेले नगरसेविकेच्या मुलाचे पावणे दोन लाख रुपयांचे दागिने परत केले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीने नगरसेविका व नागरिकांचे त्यांचे कौतुक केले आहे.

नगरसेविका कविता वैरागे यांचा मुलगा रविवारी दुपारी बाराच्या सुमारास रिक्षातून प्रवास करीत होता. तो जखम झाल्याने रुग्णालयात गेला होता. रुग्णालयातून तो रिक्षाने परत घरी जात होता. त्यावेळी त्याच्याजवळ साडेचार तोळे दागिने असलेली पिशवी होती. घरी आल्यानंतर तो रिक्षातून उतरताना तो दागिने असलेली पिशवी घेण्याचे विसरून गेला. काही वेळाने हा प्रकार लक्षात आला. पण तोपर्यंत तो रिक्षा निघून गेला होता. त्यांनी तात्काळ स्वारगेट पोलिसांकडे धाव घेतली व माहिती दिली.

यावेळी वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी याची गांभीर्याने दखल घेत तात्काळ त्या रिक्षा चालकाचा शोध सुरू केला. पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांनी परिसरातील सीसीटीव्ही पडताळणी सुरू केली. त्यांनी जवळपास १०० हुन अधिक सीसीटीव्ही तपासले. यावेळी रिक्षा चालक कात्रज परिसरात असल्याचे दिसून आले. त्यांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला व तसेच रिक्षा पहिली. त्यावेळी चालकाने ती बॅग पोलिसांना परत दिली. त्याने बॅगेत काय हे देखील पाहिले नव्हते.

पोलिसांनी बॅग वैरागे यांना देऊन पाहण्यास सांगितले. त्यावेळी त्यात सर्व दागिने होते. पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेने त्यांची बॅग परत मिळाली. यावेळी पिशवी नगरसेविका कविता वैरागे व नागरिकांनी पोलिसांचे विशेष आभार मानले. ही कामगिरी उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस कर्मचारी ज्ञाना बडे, मनोज भाकरे यांच्या पथकाने केली.

You might also like