‘कोरोना’ व्हायरसनंतर पुन्हा स्वाइन फ्लूची भीती, पुण्यात आढळले 9 रूग्ण ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहे. पुन्हा एकदा 45 दिवसांमंध्ये स्वाइन फ्लूचे 9 रुग्ण असल्याचे निदान झाले. यातील दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. H1N1 या संसर्गजन्य व्हायरसचे 9 जणांना निदान झाले आहे अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून 45 दिवसात 1 लाख 35 हजार संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1,103 रुग्णांना लसीकरण करण्यात आले. यापैकी दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

2009 साली स्वाइन फ्लूने राज्यभरात दहशत पसरवली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हे विषाणू पसरण्यास सुरुवात झाली आहे. आधीच लोकांना कोरोना व्हायरसची चिंता असताना आता स्वाइन फ्लूमुळे लोकांची काळजी आणखी वाढली आहे. एकीकडे कोरोना व्हायरसमुळे मृतांची संख्या वाढत आहे. भारतात देखील कोरोना व्हायरसचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यात स्वाइन फ्लू पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे.

ब्राझीलमध्ये yaravirus आढळला आहे. कोरोना व्हायरसच्या विळख्यात असताना आता या yaravirus मुळे खळबळ उडाली आहे. एका वृत्तानुसार ब्राझीलच्या वैज्ञानिकांना हा यारा व्हायरस निदर्शनास आला आहे. ब्राझीलच्या 2 शास्त्रज्ञांनी त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये हा नवा व्हायरस निदर्शनास आणून दिला. या व्हायरसमध्ये प्रोटीनचे एकीकरण करण्याची क्षमता असल्याचं सांगितलं जात आहे.

You might also like