Pune TADA Court | मुंबई-विरार येथील बिल्डर सुरेश दुबे खून प्रकरणी भाई ठाकूरसह तिघे निर्दोष ! टाडा काेर्टाचा चार्ज असलेल्या पुण्यातील न्यायालयाने दिला निकाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune TADA Court | विरार येथील बिल्डर सुरेश दुबे यांची दि. 9 ऑक्टोबर 1989 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्टेशनवर 6 ते 7 जणांनी गोळ्या घालून हत्या केली होती (Builder Suresh Dube Murder Case). याप्रकरणी सन 1992 साली टाडा (TADA Act) लावण्यात आला होता तर 17 आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, टाडा कोर्टाचा (Pune TADA Court) चार्ज पुण्यातील न्यायालयाकडे असल्याने भारतातील या शेवटच्या टाडा खटल्याचा निकाल विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर (Special Judge Satyanarayan Navander) यांनी दिला आहे. याप्रकरणी जयंत उर्फ भाई विष्णू ठाकूर (Jayant alias Bhai Vishnu Thakur), दीपक ठाकूर (Deepak Thakur) आणि गजानन पाटील (Gajanan Patil) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. (Pune TADA Court)

 

यापुर्वी या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये नरेंद्र भालचंद्र भोईर (Narendra Bhalchandra Bhoir), ज्ञानेश्वर पाटील (Dnyaneshwar Patil), उल्हास राणे (Ulhas Rane), पॅट्रीक तुस्कानो (Patrick Tuscano), राजा जाधव (Raja Jadhav) आणि माणिक अनंत पाटील (Manik Anant Patil) यांचा समावेश आहे. बिल्डर सुरेश दुबे खून प्रकरणी 2004 मध्ये टाडाचे विविध कलमान्वये व आर्मस अ‍ॅक्ट कायद्यानुसार आरोप निश्चत करण्यात आले होते. दरम्यान, आता न्यायालयाने भाई ठाकूर (Bhai Thakur), दीपक ठाकूर आणि गजानन पाटील यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

या प्रकरणात विशेष सरकारी वकिल सतीश मिश्रा (Adv Satish Mishra) यांनी काम पाहिले तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. सुदीप पासबोला (Adv. Sudeep Pasbola), अ‍ॅड. सुधीर शहा (Adv. Sudhir Shah), अ‍ॅड. रोहन नहार (Adv. Rohan Nahar), अ‍ॅड. प्रीतेश खराडे (Adv. Pritesh Kharade), अ‍ॅड. सचिन पाटील (Adv Sachin Patil), अ‍ॅड. रोहित तुळपुळे (Adv. Rohit Tulpule) यांनी काम पाहिले आहे.

 

Web Title :  Pune TADA Court | Mumbai-Virar builder Suresh Dubey murder case, bhai Thakur and three acquitted! The court in Pune, which is charged with Tada, gave the verdict

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा