Pune Tadiwala Road Crime | तडीपार गुंडाचा ताडीवाला रोडवर ‘राडा’ ! युवकाला मारहाण करुन पसरविली दहशत, बंडगार्डन पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Tadiwala Road Crime | तडीपार केले असतानाही ताडीवाला रोडवर येऊन युवकावर कोयत्याने वार करुन जखमी करुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न तडीपार गुंडाने केला. (Pune Tadiwala Road Crime)

बंडगार्डन पोलिसांनी अजय ऊर्फ हॅलो लक्ष्मण कांबळे (वय २१,रा. ताडीवाला रोड) याला अटक केली आहे. याबाबत आर्यन लॉरेन्स पिल्ले (वय १८, रा. ताडीवाला रोड) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४५/२४) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कांबळे याला पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी
६ नोव्हेबर २०२३ रोजी दोन वर्षांकरीता पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
असे असतानाही तो ताडीवाला रोडवर येत असतो. फिर्यादी व त्यांच्या गल्लीत राहणारा मुलगा गुरुजी हे रविवारी रात्री नऊ वाजता मोटारसायकलवरुन जात होते. त्यावेळी कांबळे याने त्यांना गाडी थांबविण्यास सांगून कारे तुला मस्ती आली काय, तुझा बाप आता जेलमध्ये आहे. आज मी तुला बघतोच आणि तुझ्या बहिणीला पण दाखवितो, हॅलो काय आहे ते़ आता फक्त मी ताडीवाल्याचा भाई आहे, बघतोच कोण मध्ये येतो, असे म्हणून शिवीगाळ करुन लोखंडी कोयता फिर्यादीच्या कपाळावर मारुन जखमी केले. दोघे पळून गेल्यावर त्यांचा पाठलाग करुन हातातील कोयता हवेत फिरवून मी इथला भाई आहे बघतोच आज तुला वाचवायला कोण येतो, असे म्हणत परिसरात दहशत पसरविली. सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम (API Nandkumar Kadam) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Datta Nagar Crime | ‘तुला पण तुझ्या बापासोबत संपवून टाकतो’ ! पितापुत्राच्या पोटात चाकूने सपासप वार करुन जीव ठार मारण्याचा प्रयत्न

Fire At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवरील डब्याला मध्यरात्री आग; यार्डातील डबा जळून खाक, जीवित हानी नाही (Video)

TET Exam Scam | टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे एक कोटींचे दागिने न्यायालयाने केले परत