पुणे : दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून वेगवगळ्या पद्धतीने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. वाहतूक शाखेकडून शनिवार (दि.११) आणि रविवार (दि.११) या दोन दिवशी ‘ड्रंक अॅड ड्राईव्ह’ बाबत विशेष मोहिम राबविण्यात आली.
[amazon_link asins=’B06Y5XBL8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de203579-9efc-11e8-a550-a161e2f43deb’]

पुणे वाहतूक पोलिसांनी गटारी आमावस्येच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या ‘ड्रंक अॅड ड्राईव्ह’ कारवाईत ४८८ वाहनचालकांवर कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.

मद्यपानकरुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहिम यापुढेही सुरु राहणार आहे. तरी नागरिकांनी मद्यपान करुन वाहन चालवू नये. वाहतूकीच्या नियमांचे पालन करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.