Pune : 9 लाख रूपयांच्या लाच प्रकरणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी शाम पोशट्टी अ‍ॅन्टी करप्शनच्या ताब्यात, उद्यान पर्यवेक्षक विशाल मिंड आणि पोशट्टीवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शाम लक्ष्मणराव पोशट्टी (वय 44) यांच्यासह दोघांवर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(Bribe)(अ‍ॅन्टी करप्शन) 9 लाख रुपयांची लाच(Bribe) मगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुख्याधिकारी शाम पोशट्टी यांना एसीबीने अटक केली आहे. त्यांच्या घराची झडती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा ! लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून आदेश; जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

शाम लक्ष्मणराव पोशट्टी (44) व विशाल अंकुश मिंड (33) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : कोरोना नियमांचे उल्लंघन ! भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर FIR

लोकसेवक विशाल हे तळेगाव दाभाडे नगर परिषद येथे उद्यान पर्यवेक्षक आहेत. यातील तक्रारदार हे ठेकेदार आहेत. त्यांची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीला तळेगाव दाभाडेनगर परिषद हद्दीत काम मिळालेले होते. हे काम पूर्ण झाले आहे. एकूण चार कामांचे बिल राहिले होते. हे बिल काढण्यासाठी ते पाठपुरावा करत होते. यावेळी हे बिल काढून देण्यासाठी लोकसेवक विशाल यांनी 9 लाख रुपयांची लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. तर या लाचेच्या मागणीला मुख्याधिकारी शाम लक्ष्मणराव पोशट्टी यांची सहमती होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार पडताळणी करून लाच मगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोशट्टी यांना एसीबीने अटक केली आहे. त्यांच्या घराची झडती घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.

Pune : शिवाजीनगर न्यायालयातील वकिलास महिलेकडून 10 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

शिवाजीनगर न्यायालयातील वकिलास आज 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अ‍ॅन्टी करप्शन) रंगेहात पकडले आहे. हरिकिशन श्रीरामजी सोनी ( वय ५७) असे पकडलेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांचा कौटुंबिक न्यायालयमध्ये खटला सुरू आहे. तो खटला चालविण्यासाठी तक्रारदार यांनी डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी यांना वकील मिळावा म्हणून विनंती केली होती. डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथोरिटीने ऍड. हरिकिशन सोनी यांची महिलेच्या बाजूने लढण्यासाठी शासनातर्फे नियुक्ती केली होती. सोनी यांना याबदल्यात शासनाकडून फी अदा करण्यात येते. तर नियुक्ती आदेशातही तक्रारदार यांनी वकिलांना कोणतीही रक्कम देण्याची गरज नाही, असे नमूद असते. तरीही सोनी यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. त्याबाबत त्यांनी ACB कडे तक्रार केकी होती. त्यानुसार आज सापळा कारवाईत 10 हजाराची लाच घेताना त्यांना पकडले गेले आहे.

 

Coronavirus in Pune : मोठा दिलासा ! पुण्यात दुसर्‍या लाटेतील सर्वात ‘निच्चांकी’ रूग्णसंख्या

Chest Physiotherapy : श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चेस्ट फिजियोथेरेपी करा, जाणून घ्या पद्धत आणि फायदे

शिवसेना आमदाराला ‘ते’ प्रकरण पडले महागात; न्यायालयाने सुनावली 6 महिन्यांची शिक्षा अन् दंड