Pune : महिलांना अश्लील व्हिडीओ दाखवून विनयभंग करणारा चहावाला ‘गोत्यात’; पिंपरीतील घटना

पिपंरी : पोलीसनामा ऑनलाइन – दुकानात चॅर्जिगसाठी ठेवलेल्या मजूरांच्या मोबाईलच्या नंबरवरुन दुकानात आलेल्या महिलांचे नंबर घेऊन त्यांना अश्लिल व्हिडिओ दाखवून अश्लिल मेसेज करणार्‍याला वाकड पोलिसांनी Wakad police अटक केली. संपत राम (रा. चहाचे दुकान, रामदेव सुपर मार्केटजवळ, बाणेर, मुळ गाव जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वाकड येथील एका महिलेला दोन वेगवेगळ्या व्हॉटसअ‌ॅप नंबरवरुन अश्लिल मेसेजेस व अश्लिल व्हिडिओ कॉलिंग करुन विनयभंग करण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाचे CBSE अन् ICSE बोर्डाला स्पष्ट आदेश, म्हणाले – ’12 वीच्या निकालासाठीचे निकष 2 आठवड्यात सांगा’


वाकड पोलीस Wakad police ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी तपास पथकाला आरोपीच्या शोधाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सुनिल टोणपे, सहायक निरीक्षक एस. एम. पाटील यांनी ज्या मोबाईलवरुन हे मेसेजेस आले होते. त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यात हे फोन बाणेर येथून आल्याचे निष्पन्न झाले. त्या मोबाईलधारकांकडे चौकशी केल्यावर त्यांच्या मोबाईलचा दुसर्‍याने वापर केल्याचे आढळून आले.

50 हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

अधिक तपासात चहाच्या दुकानातील संपत याने हा प्रकार केल्याचे उघउकीस आले.
त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन मोबाईल, तीन वेगवेगळे सीम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. आरोपीचे चहाचे दुकान होते. त्याच्याकडे येणारे गरीब मजूर त्यांचा मोबाईल चर्जिंगला लावून कामाला जात असायचे. त्यापैकी साधे मोबाईल ज्यामध्ये व्हॉटसअ‌ॅप नसते. अशा मोबाईल नंबरचे व्हॉटसअ‌ॅप त्याचे स्वत:चे मोबाईलमध्ये चोरुन घेऊन त्यावरुन तो गुन्हे करीत होता. तसेच तो पूर्वी फर्निचरच्या दुकानात काम करीत होता. त्यावेळी दुकानात आलेल्या ग्राहकांचे नंबर त्याने स्वत:कडे ठेवलेले होते. त्या नंबरवर तो अशा प्रकारचे कॉलिंग करून त्यांना त्रास देत असायचा. त्याने फिर्यादीप्रमाणे इतरही काही महिलांना अशा प्रकारे अश्लिल मेसेजेस व अश्लिल व्हिडिओ कॉल करुन त्रास दिला असण्याची शक्यता आहे. त्यांनी वाकड पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

READ ALSO THIS :

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे