Pune : तंत्रज्ञानाने बहरेल पुन्हा सांस्कृतिक क्षेत्र – राज ठाकरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना असला तरी तंत्रज्ञानाच्या वापराने सांस्कृतिक क्षेत्राला पुन्हा चांगला बहर येईल अशी खात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या मागील २२ वर्षांचा चित्रमय आढावा घेणाऱ्या ई बुक चे प्रकाशन आणि यावर्षीच्या डिजीटल महोत्सवाच्या संकेतस्थळाचेही अनावरणही राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी मुंबईत कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यावेळी महोत्सवाच्या ‘चला कोरोनाला हरवूया’ या घोषवाक्याचे त्यांनी कौतूक केले.

संस्थापक अध्यक्ष अँड. गणेश सातपुते, महेश महाले, आदित्य सातपुते, स्वप्निल नहार, जय भिसे यावेळी ऊपस्थित होते. राज ठाकरे यांनी ई बुक पाहिले तसेच डिजिटल पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या संकल्पनेचे कौतूक करताना तंत्रज्ञानाचा असाच योग्य वापर करायला हवा असे सांगितले. कोरोना मुळे काही मर्यादा आल्या असल्या तरी तंत्रज्ञानाच्या वापराने त्या दूर होतील व या क्षेत्रात पुन्हा बहर येईल असे राज ठाकरे म्हणाले.

चला कोरोनाला हरवूया हे उत्सवाचे घोषवाक्य ठीक आहे, पण कसे हरवणार ते सांगा अशी विचारणा यावेळी राज ठाकरे यांनी केली त्यावर अँड गणेश सातपुते यांनी त्यांना मास्क, सँनिटायझर वाटप, संकेतस्थळावर रोज असलेले एका तज्ञ डॉक्टरांचे व्याख्यान व नागरिकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी करणार असलेले वेगवेगळे उपक्रम याची माहिती राज ठाकरे यांना दिली.