Pune Temperature | डिसेंबर अखेर राज्यात थंडीचा कडाका वाढणार, पुण्याच्या तापमानात घट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Temperature | मागील काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Rains) धुमाकूळ घातला. ऐण हिवाळ्यात पावसाने जोर धरल्याने राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह भारतात पाऊस कोसळला. मागील तीन दिवस पाऊस थांबला असला तरी महाराष्ट्र थंडीने (Maharashtra Temperature) गारठला असल्याचं चित्र दिसत आहे. त्याचबरोबर आता पुण्यात तापमानाचा (Pune Temperature) पारा आता कमी झाला आहे. त्यामुळे पुणेकरही थंडीच्या कचाट्याच सापडले आहेत.

 

डिसेंबरनंतर आता राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा (Pune Temperature) पारा घसरला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर (Shirur) याठिकाणी सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय. याठिकाणी आज (बुधवारी) 13.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या आठवड्यात महाराष्ट्रात आणखी गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.

 

 

आज (बुधवारी) सकाळी पुण्यातील शिरुर (Shirur) याठिकाणी सर्वात कमी 13.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तसेच हवेली (13.4), पाषाण (pashan) (13.7) एनडीए (NDA) (13.9), शिवाजीनगर (Shivajinagar) (14.3), माळीण (malin) (14.4) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. पुण्यातील अन्य ठिकाणी 15 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान आहे.

 

दरम्यान, 20 डिसेंबरनंतर उत्तरेकडील थंडगार वारे महाराष्ट्राच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहेत.
तसेच अनेक ठिकाणी अति उच्च दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे.
या एकंदरीत परिणाम म्हणून डिसेंबरचा शेवटचा आठवडा महाराष्ट्रासाठी
हाडं गोठावणारा ठरणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) दिली आहे.

 

Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा