Pune Temperature | महाराष्ट्र गारठला ! पुण्यात तापमानाचा पारा 13 अंशावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Temperature | मागील काही दिवस राज्यातील अनेक भागात पावसाने (Maharashtra Rain) जोर धरला होता. ऐण हिवाळ्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने दोन्ही ऋतु बघायला मिळाले. यामुळे सर्वत्र थंडीचा तडाखा जाणवू लागला आहे. एकीकडे महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. तर, पुण्यात (Pune Temperature) तापमानाचा पारा 13 अंशावर आला आहे. त्यामुळे पुणेकर गारठले असल्याचं चित्र दिसत आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र विरल्यामुळे आता पुण्यासह (Pune Temperature) महाराष्ट्रात हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात झालीय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी पडत असून 15 डिसेंबरनंतर थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने (Indian Meteorological Department) आगामी आठवडाभर महाराष्ट्रात कोणताही इशारा दिला नाही. आगामी पाच ही दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान पडण्याची शक्यताही (Indian Meteorological Department) वर्तवली आहे.

 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळामुळे गेले काही दिवस पुण्यासह महाराष्ट्रात (Pune Temperature) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यामुळेही कडाकीची थंडी पडली आहे.

 

दरम्यान, काल (रविवारी) महाबळेश्वर येथे सर्वात कमी 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
मुंबई आणि पुण्यातही तापमानाचा पारा घसरला. रविवारी मुंबईत 22 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली,
तर, आज सकाळी पुण्यात पाषाण याठिकाणी सर्वात कमी 13.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय.
तर हवेली 13.8, एनडीए 14.2, राजगुरुनगर 14.8, शिवाजीनगर 14.7 आणि माळीण येथे 14.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीय.

 

Web Title :- Pune Temperature | weather forecast in maharashtra today temperature decrease in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Banks Strike | खासगीकरणाविरोधात 2 दिवसांचा संप करणार बँक कर्मचारी, घरातून बाहेर पडण्यापूर्वी तारीख तपासा

Indian Bison Pune | पुण्यात ‘थरार’ केलेल्या ‘त्या’ रानगव्याची Facebook लाईव्हद्वारे प्रायश्चित सभा होणार

Pune News | 1971 च्या युद्धातील इंदिरा गांधी यांचे योगदान अविस्मरणीय ! शूर-वीरांचा इतिहास नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता – मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन