Pune : टेम्पो चालकाने दुचाकीला ओव्हरटेक केल्याने जाब विचारणाऱ्या दुचाकीस्वाराला रॉडने बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   टेम्पो चालकाने दुचाकीला ओव्हरटेक केल्यानंतर दोघांत यावरून चांगलाच वाद झाला. वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाल्यानंतर टेम्पो चालकाने त्याला रॉडने बेदम मारहाण केली. फुरसुंगीतील मंतरवाडी पुलावर हा प्रकार घडला.

या प्रकरणी टेम्पोचालक अनुप हरिश्चंद्र राऊत (वय ४२, रा. काळेपडळ, हडपसर) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दीपक शिवाजी अवताडे (वय २८, रा. हांडेवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी दीपक आणि त्यांचा भाऊ तुषार दुचाकीवरून मंतरवाडी पुलावरून चालले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोचालक अनुपने दीपकच्या दुचाकीला ओव्हरटेक केले. त्याचा राग आल्यामुळे दीपकने पाठलाग करून अनुपला अडवून जाब विचारला. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचा राग आल्यामुळे अनुपने दीपकच्या कानावर रॉडने मारहाण करून जखमी केले. अधिक तपास पोलीस हवालदार देवधर करीत आहेत.