Pune : हातात कुऱ्हाडी, तलवार आणि हॉकी स्टिक घेऊन परिसरात दहशत, तरूणावर सपासप वार, पोलिसांकडून 7 जणांचा अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हातात कुऱ्हाडी, तलवार आणि हॉकी स्टिक घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळक्याने केवळ आपल्याला पाहून पळून न गेल्याने एका तरुणावर पाठलाग करून सपासप वार केल्याचा खळबळजनक प्रकार खडकी बाजार परिसरात घडला आहे. पुण्यातील खडकी परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

शुभम आगलावे (वय 19), दीपक आगलावे (वय 18), अनिकेत चांदणे (वय 19), व्यंकटेश मुदलियार (वय 20), शरद तायडे (वय 20), कपिल भोसले (वय 19) व रोहित लांडगे (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. तर 17 वर्षीय दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. याबाबत समीर अकबर पटेल (वय 20) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास येथील खडकी बाजार मधील दुर्गा वसाहत येथे गप्पा मारत बसले होते. यावेळी 8 ते 9 जणांचे टोळके हातात कोयते, कुऱ्हाडी, हॉकी स्टिक या सारखे घातक शस्त्र घेऊन परिसरात आले आणि अचानक तुफान गोंधळ घालण्यास सुरुवात केली. टोळक्यांच्या राड्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. नागरिक पळापळ करत असताना फिर्यादी मात्र त्यांच्या मित्रांसोबत त्याच ठिकाणी उभा राहून या टोळक्याचा राडा पाहत होते.

याचा राग आरोपींना आला त्यांनी आम्हाला पाहून पळत नाही असे म्हणत पकडो इनको काट डालो असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी हे तेथून पळून गेले. पण आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि फिर्यादीवर जीवेघेणा हल्ला केला. अचानक झालेल्या याप्रकरणामुळे चांगलाच राडा झाला होता. घेतनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसरात झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

You might also like