पुणे : मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची (मोक्का) कारवाई केलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या सामाजीक सुरक्षा विभागाच्या पथकाने  छत्तीसगडमधून अटक केली. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर येरवडा पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल असून त्याला न्यायालयाने ८ ऑगस्ट पर्य़ंत पोलीस कोठड सुनावली आहे. दरम्यान गुन्हे शाखेच्या इतर पथकाने देखील विविध गुन्ह्यात फरार आरोपींना अटक केली आहे.
[amazon_link asins=’B077FV77TN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0640c3ff-97e6-11e8-8287-43204b6eb77b’]

जॉन उर्फ जेटीन मोहन चावडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

जेटीन चावडा हा छत्तीसगडमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. पथकाने छत्तीसगडमध्ये जाऊन आरोपीला अटक केली. छत्तीसगड न्यायालयातून ट्रान्झिट रिमांडवर त्याला पुण्यात आणण्यात आले. त्याला आज (शनिवार) दुपारी  गुन्हे शाखा -२ चे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ८ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रदिप देशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, पोलीस उप निरीक्षक खेडकर यांच्या पथकाने  केली.

घरफोडीतील आरोपींना मुद्देमालासह अटक

क्राईम युनिट चारचे पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत दोन गुन्हेगारांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहे. पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. संजय भाऊराव देशमुख (वय-३२ रा. भोसरी) आणि सुनील सिद्राम परमगोळ (वय-२०, रा. सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संजय देशमुख याला अटक करुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने लॅपटॉप आणि मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी १ लॅपटॉप आणि २ मोबाईल असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. युनिट चारच्या पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने २ लाख ५० हजार रुपांचे १६ स्मार्ट फोन आणि दोन लॅपटॉप चोरल्याची कबुली दिली. तर सुनिल परमगोळ याच्याकडून २० हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त केले.
[amazon_link asins=’B0756HL9FK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0dff7da7-97e6-11e8-b5bb-7d369018d7f7′]प्रवासात महिलांचे मोबाईल चोरणारा गजाआड

बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलांचे स्मार्ट फोन चोरणाऱ्या चोरट्याला उत्तर  विभागाच्या गुंडा स्कॉड पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून १ लाख ९ हजार ९९० रुपयांचे ९ स्मार्ट फोन जप्त करण्यात आले आहेत. संदेश दिपक गंगावणे (वय-२१ रा.सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुंडा स्कॉडचे पोलीस हवालदार शेलार यांनी गंगावणे याची बातमीदारामार्फत माहिती घेऊन अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ९ स्मार्ट फोन जप्त केले आहे. आरोपीने हे फोन डेक्कन, शिवाजीनगर, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

गँगस्टरला पिस्तूलासह अटक

युनिट पाचचे पोलीस निरिक्षक दत्ता चव्हाण यांच्या पथकाने हडपसर येथे केलेल्या कारवाईत एका गँगस्टरला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. प्रमोद गणेश गजारे (वय-२७ रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या गँगस्टरचे नाव असून तो पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत.

वाहन चोराला अटक

रिक्षा चालकाला मारहाण करुन एक लाख ८० हजार रुपांची रिक्षा चोरुन नेल्याची घटना डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी अविनाश सुरेश बोधे (वय-४५ रा. कसबा पेठ) याला अटक करुन रिक्षा जप्त केली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या वाहन विरोधी पथकाने केली. पोलिसन निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

खालील लिंक च्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/