धावत्या कारने घेतला पेट

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – गर्दी अन रस्त्यावर फुल रहदारी असताना एका चालत्या कारणे पेट घेतला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मात्र वाहन चालक भयभीत झोले होते. पाषाण परिसरात ही घटना पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.

एम.एच. 08.आर. 1118 ही कार घेऊन चालक रात्री पावणे आठला लष्कर परिसरातून वाकडच्या दिशेने जात होता. यादरम्यान पाषाण येथील सुतार वाडी पोलीस चौकी समोर आल्यानंतर अचानक कारच्या पाठीमागून धूर हेत असल्याचे निदर्शनात आला. यावेळी नागरिकांनी आरडा- ओरडाकरून चालकाला याची माहिती दिली. त्यावेळी त्याने कार थांबवली तसेच पाहिले असता पाठीमागे मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे दिसले. नागरिकांनी ही माहिती पोलीस व अग्निशमन दलाला दिली. यावेळी पाषाण केंद्राचे शिवाजी मेमाणे, पालवे, संगम, भडारे, बिराजदार यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. नेमकी आग का लागली हे समजू शकले नाही. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मात्र मोठी दुर्घटना टळली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/