Pune : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ भोसले यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस ठाण्याचे अतिशय शिस्तप्रिय वरिष्ठांचे आदेश पाळणारे आणि व्यक्तिगत व कौटुंबिक जीवनामध्ये अतिशय सुसंस्कृत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ भोसले यांचं कोरोना लढ्यामध्ये नुकतेच नोबेल हॉस्पिटल या ठिकाणी निधन झाले.सुरुवातीची काही वर्ष सेवा त्यांनी राज्य राखीव पोलिस दलामध्ये केली नंतर ते पुणे ग्रामीण पोलीस दलात आले होते.

त्यांची २३ एप्रिल रोजी टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना जेजुरी आय सी यु रुग्णालयांमध्ये ॲडमिट करण्यात आलेले होतं. सुरुवातीला त्यांची प्रकृती चांगली होती परंतु परवा पहाटेपासून त्यांना अतिशय त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना नोबेल हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आलं माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पुण्यामध्ये व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नसताना सुद्धा नोबेल हॉस्पिटल प्रशासनाशी बोलून व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यात आला. परंतु म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या उक्तीप्रमाणे त्यांची प्राणज्योत नुकतीच मालवली सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांना वाचू शकले नाही. याचं दुःख संपूर्ण पोलीस दलास आहे.

त्यांच्या पाठीमागे आई पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. जगन्नाथ भोसले सारखा कर्मचारी घडवणं आता खूप कठीण आहे त्यांच्या अंगातील उपजत गुण व शिस्तप्रियता हे गुण फार दुर्मिळ आहे म्हणून पोलीस दलाची खूप मोठी हानी झालेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील,पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व जेजुरी पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन केले. पुरंदर तालुक्यातील तसेच बारामती मधील अनेक सामाजिक व राजकीय लोकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलेले आहे .त्यांच्या कुटुंबांना सर्वतोपरी आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यांच्या सर्व सुख दुःखामध्ये यापुढे पुणे पोलीस दल पाठीशी असेल.काल मुंडवा स्मशानभूमी याठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व काही मोजके कर्मचारी व नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक अंतर ठेवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनाने जेजुरी पोलीस ठाण्यावर शोककळा पसरली आहे.