Pune : गोसावीवस्तीमधील संविधान सोसायटीचे तुंबलेले चेंबर तरुणांनी केले स्वच्छ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गोसावीवस्तीमधील Gosavivasti संविधान सोसायटीच्या सांडपाण्याची वाहिनी तुंबली असून, दुर्गंधीयुक्त पाणी चेंबरमधून परिसरात वाहत आहे. सोसायटीच्या तळमजल्यावर कचरा आणि सांडपाण्याच्या दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयाची आरोग्य कोठी हाकेच्या अंतरावर आहे, त्यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणी दुरुस्त करत नसल्याने येथील तरुणांनी स्वतःच चेंबरमध्ये उतरून स्वच्छ केला, असे साहसी फाउंडेशनच्या अध्यक्षा मयुरी बामणे यांनी सांगितले.

Lockdown in Maharashtra : ‘नाईलाजानं जनतेवर निर्बंध लादण्याचं काम करावं लागतंय, राज्यात निर्बंध 15 जूनपर्यंत कायम राहणार’ – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

बामणे म्हणाल्या की, वैदूवाडी (गोसावीवस्ती Gosavivasti, म्हाडा- सुरक्षानगर) येथील संविधान सोसायटीमधील सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी २४० कुटुंबातील नागरिक झगडत आहेत. वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाकडे वारंवार तक्रार अर्ज करूनही कोणी लक्ष देत नाहीत. लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे कर्मचारी म्हणतात किमान दोन वर्षे येथील कामे होऊ शकणार नाहीत. संविधान इमारतीच्या तळमजल्यावर सांडपाणी आणि कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोरोना महामारीची आणि त्यातच सोसायटीमधील दुर्गंधीमुळे जीव नकोसा झाला आहे. मागिल काही वर्षांपूर्वी सिंहगड रोडवरील नागरिकांचे येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. या नागरिकांची शिधापत्रिका अद्याप सिंहगड रोड येथेच आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार प्रश्न मांडला आहे, मात्र कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे शिधापत्रिकेवरील धान्य घेण्यासाठी या नागरिकांनी सिंहगड रोड येथील स्वस्तधान्य दुकानामध्ये जावे लागते. लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली, तर लक्ष दिले जात नाही, महापालिका अधिकारी दुर्लक्ष करतात, त्यामुळे येथील नागरिकांना कोणी वालीच राहिला नाही, अशी अवस्था येथील नागरिकांची झाली आहे.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’