पुणे : मॅट्रिमोनियल साईटवरुन तरुणींना गंडवणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मॅट्रिमोनियल साईटवर तरुणींशी संपर्क साधून लग्नाचे अमिष दाखून मुलींना लुटणाऱ्या भामट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. लग्नाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून पसार व्हायचे, अशी मोडस ऑपरेंडी असलेल्या भामट्याला अटक करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B015H0AKTS,B01DSP5G0C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d91c046b-868e-11e8-b446-b3dd6a195e66′]

कृष्णा चंद्रसेन देवकाते असे हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर कृष्णाने वेगवेगळ्या नावाने नोंदणी केली. पुण्याबरोबरच ठाणे, नवी मुंबई आणि इतरही ठिकाणच्या अनेक मुलींची त्याने फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती आहे.

हडपसर येथील एका तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून कृष्णाने तिच्याकडून पैसे घतेले होते. मात्र, हा प्रकार लक्षात आल्यावर तिने पोलिसात तक्रार दिली आणि हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला.