Pune : आबुधाबीत नोकरीच्या आमिषानं तरूणाला पावणे 3 लाखांना फसवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आबुधाबीत नोकरी लावण्याच्या आमिषाने एका तरुणाची पावणे तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. मार्च ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी अनिल काळे (वय 57) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी इंन्दीड या वेब पोर्टलवर नोकरी मिळण्यासाठी नोंदणी केली होती. त्यावेळी आरोपी दोघांनी त्यांना फोनद्वारे संपर्क साधला. तसेच त्यांना आबुधाबी येथे ऑडनॉक पेट्रो केमिकल या कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्यांना या कंपनीत जागा उपलब्ध असून, तुम्हाला नोकरी देऊ, असे म्हणत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फोनवरच त्यांची मुलाखत घेतली. तसेच त्यांना नोकरी लागल्याचे सांगत व्हिजा, राहण्याची सोय व इतर गोष्टी यासाठी वेळोवेळी 2 लाख 81 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी पैसे भरले. पण त्यांना नोकरी लागली नाही. यावेळी त्यांना फसवणूक झाली असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.