Pune : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष; तरुणाची 95 हजार रुपयांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणाची 95 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी मुकेश सोमवंशी (वय 23) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यावेळी त्याने स्वतःचे नाव अशिष असल्याचे सांगितले. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देईल असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी देखील त्याच्या आमिषाला बळी पडले. त्याने सांगितल्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यात 95 हजार 500 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्यानंतर फिर्यादी वारंवार संबंधित व्यक्तीला फोन करून नफा देण्याची मागणी केली. परंतु, त्याने कुठल्याही प्रकारचा नफा न देता आणि फिर्यादीचे पैसे परत न करता फसवणूक केली. अधिक तपास उपनिरीक्षक थोपटे करत आहेत.