Pune : भिडे पुलाखालील नदीपात्रात वाहून गेलेल्या दोघांचा NDRF चा शोध सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   भिडे पुलाजवळ नदीपात्रात फोटो काढण्यास उतरल्यांतर वाहून गेलेल्या त्या दोन तरुणाच्या शोधासाठी एनडीआरएफची पथक आज दाखल झाले आहे. अग्निशमन, एनडीआरएफ व पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

ओकार तुपधर (वय १८) व सौरभ कांबळे (वय २०, दोघेही रा. ताडीवाला रोड) अशी बुडालेल्या तरूनांची नावे आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रात पाऊस होत आहे. त्यामुळे धरण भरले गेली आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुळा मुठा नदी दुथडी भरून वाहत आहेत.

शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सौरभ व ओमकार आणि एक मित्र भिडे पुलाजवळ नदीपात्रात फोटो काढत होते. कपडे काढून ते पाण्यात उतरून फोटो काढत असताना एकजण वाहून जाऊ लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र सौरभ गेला. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. यावेळी तिसऱ्या मित्राने व नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवनांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तरुणांचा शोध घेतला. पण त्यांचा शोध लागला नाही. आज सकाळी देखील शोध सुरू केला आहे. दरम्यान त्या दोघांच्या शोधासाठी आज एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. त्याच्याकडून त्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.