पुणे : ससाणेनगरकडे जाणारा रस्ता दोन दिवस वाहतूकीसाठी बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

हडपसर येथील भाजी मंडई (मंत्रीमार्केट) ते गंगा रेसिडन्सी या मार्गावर असलेली कमान जुनी झाली आहे. ही आर.सी.सी कमान पाडण्याचे काम मंगळवारी (दि.३१) सकाळी आकरा वाजता सुरु करण्यात येणार आहे. हे काम बुधवारी (दि. १ ऑगस्ट) रात्री आकरापर्यंत चालणार आहे. या वेळेत मंत्री मार्केट कडून ससाणेनगरकडे जाणारा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B06X9QQN51′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f40e2e20-9404-11e8-83b4-815419b03088′]
कमान पाडण्याच्या वेळेत परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये तसेच वाहन चालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहन चालकांनी पर्य़ायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी केले आहे. वाहन चालकांनी मंत्री मार्केटकडून ससाणेनगरकडे जाण्यासाठी हडपसर वेस येथून उजवीकडे वळून ससाणेनगरकडे जावे.

वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.