Pune : 25 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर पत्नीनं पुर्वीच्या ‘लव्हर’सह मिळून 27 वर्षीय IT इंजिनिअर पतीच्या गुप्तांगाची नस कापण्याचा रचला कट, पुढं झालं ‘असं’ काही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   प्रियकरासोबत विवाह न करता आल्याने तिचा विवाह दुसऱ्या मुलाशी झाला अन् ती पहिल-वहील प्रेम विसरली देखील. पण काही महिन्यात तिला पहिल्या प्रेमाची आठवण झाली आणि पुन्हा त्यांच सूत जुळलं. त्यातून तिनं आणि प्रियकरानं चक्क पतीलाच नपुंसक बनवण्याचा प्लॅन आखला. सुदैवाने तो पतीला समजला आणि तो वाचला. पुण्यातल्या वारजे माळवाडी भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 25 वर्षीय तरुणी आणि तिचा 22 वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे उच्च शिक्षित असून, मोठं मोठ्या कंपन्यात नोकरी करतात. फिर्यादी हा आयटी इंजिनिअर आहे तर पत्नी व तिचा प्रियकर हे मकेनिकल इंजिनिअर आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच फिर्यादी यांचा विवाह झाला होता. रीती रिवाजने हा विवाह झाला होता. पण पत्नीचे पूर्वी यातील आरोपीसोबत प्रेम संबंध होते. मात्र त्यांचा विवाह होऊ शकत नव्हता. त्याला विरोध झाला असता आणि कुटुंबात वाद झाले असते यामुळे दोघांनी एकमेकांना विसरण्याचे ठरवले. तसे झालेही आणि तिचा विवाह फिर्यादीसोबत झाला. मात्र विवाहानंतर काही महिन्यातच ते दोघे अपघाताने पुन्हा भेटले आणि या कारस्थानाला सुरुवात झाली. त्या दोघांनी फिर्यादी यांच्या गुप्तांगाची नस कापून त्याला नपुसंक बनवण्याचे ठरवले. हाईक मेसेंजरवर चाटद्वारे ते या प्लॅनबाबत बोलत होते. सुदैवाने फिर्यादी यांनी ते मेसेज वाचले आणि त्या कटकरस्थाना पूर्वीच हा प्रकार समोर आला. फिर्यादीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू केला आहे.

You might also like