Pune : वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांचेच काम कौतुकास्पद – शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे

पुणे : कोरोना महामारीची मगरमिट्टी अधिक घट्ट होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाला आहे. कोरोनाबाधितांच्या तुलनेत हॉस्पिटल कमी पडत आहेत. त्यातच बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड, रेमडिसिव्ह इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची पुरते ससेहोलपट होत आहे. तरीसुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये डॉक्टर, नर्सेस, आरोग्य अधिकारी व कर्मचारी जबाबदारीने रुग्णांवर उपचार करीत नातेवाईकांना धीर देत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे, असे मत नागरिक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी व्यक्त केले.

वडगाव-धायरी-सनसिटीचे (प्रभाग क्र.33) नगरसेवक राजाभाऊ मुरलीधर लायगुडे व यंशवत रामदास लायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे व महिला अध्यक्षा मोनाली विधाते यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महापालिकेच्या सिंहगड रोड येथील लायगुडे कोविड सेंटरमध्ये केक कापून जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी लायगुडे कोव्हीड सेंटरचे फार्मासिटीज कल्पेश घोलप, डॉ. अक्षय संतात, प्रमोद गिरी, तानाजी काटेवाड, संगरकशीता वाघमारे, सविता नेमाडे, अनिता चौघुले (बिरामने). सुशमा शिरसाट, संगीता गंवळी, लिना मारून, भाग्यश्री बिरादार, रेखा मिटकरी, वर्षा कोलते, पूजा तांबट, शितल शिंदे, तानाजी काटेवाड, मानसी पंडीत, सोनाली मोटे, रेखा सदिनदे, कावेरी लहाने, गायत्री काळभोर, पृथा ढोले, केतकी देशमाने, सविता कांबळे, स्नेहल वाडकर, रूपाली घाडवे आदी उपस्थित होते. नागरिक शेतकरी संघाचे विश्वराज विधाते, मजिता सिंग, सुग्रीव धावारे, राजनंदिनी गव्हाणे, नितीराज कदम, नितीन सुर्वे, दिपक चौघुले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.