Pune : पुणे महापालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात बंद फ्लॅट, दुकान आणि मंदिरात चोऱ्या होत असताना आता हे चोरटे शासकीय कार्यालयेत देखील घुसले असून मध्यवस्तीमधील महापालिकेच्या किटक प्रतिबंधक विभाग कार्यालय चोरट्यांनी फोडले आहे. येथून चोरट्यांनी संगणक, कि-बोर्ड तसेच प्रिंटर असे साहित्य चोरून नेण्यात आले आहे.

याप्रकरणी किटक प्रतिबंधक विभागातील कर्मचारी अतीक सय्यद (वय ४९, रा. रास्ता पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाड्याजवळील भुयारी मार्गात विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात किटक प्रतिबंधक विभागाचे कार्यालय आहे.

कार्यालयात संगणक, कि-बोर्ड, प्रिंटर, माऊस असे साहित्य होते. यादरम्यान कार्य बंद असताना अज्ञात चोरट्यांनी या कार्यालयाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. तसेच आतील साहित्य चोरून नेले. हया प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. दरम्यान शनिवारवाडा भुयारी मार्गात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सध्या वर्दळ खूपच कमी आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विष्णू देशमुख करत आहेत.