Pune : येरवडा मेंटल हॉस्पीटलच्या अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानात चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा मनो रुग्णालयाचे अधीक्षकांच्या शासकीय निवास्थान असलेल्या घरात शिरून अज्ञात चोरट्यानी मोबाईल आणि रोकड चोरून नेली असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, त्यांचे सासू-सासरे घरी असताना ही चोरी झाली आहे.

याप्रकरणी लाईन डफेदार विनोद पायमपल्ली (वय 45) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे (मेंटर हॉस्पिटल) येरवडा मनो रुग्णालय येथे लाईन डफेदार आहेत. येरवडा मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. फडणीस हे त्यांच्या कुटुंबासोबत बंगला नंबर एक येथे राहतात. येथे शासकीय निवास्थाने आहेत.

दरम्यान डॉ. फडणीस यांचे सासू-सासरे एक महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे राहण्यास आले आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी (दि. 10) त्यांचे सासू-सासरे खोलीचा दरवाजा आतून बंदकरून झोपले होते. तरीही अज्ञात चोरटयांनी दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. तसेच, त्यांच्या घरातून अधीक्षक फडणीस यांचा मोबाईल आणि रोकड चोरून नेली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी लाईन डफेदार यांच्याकडे याबाबत महिती घेतली. त्यानंतर लाईन डफेदार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.