लहान मुलाला गोड बोलून घरात शिरलेल्या चोरट्यांनी ऐवज चोरला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा परिसरात एका 8 वर्षाच्या मुलाला गोड बोलून घरात शिरलेल्या चोरट्यांनी किंमती ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे.
राजेंद्र भोसले (वय 38, रा. कोंढवा -बुद्रुक) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र एका खासगी कंपनीत कामाला आहेत. कोंढव्यातील भगवान चौकात राहायला आहेत. सोमवारी दुपारी राजेंद्र यांची पत्नी कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यावेळी त्यांचा आठ वर्षीय मुलगा एकटाच घरी होता. त्यावेळी चोरट्याने मुलाशी तुमच्या घरात डीश टिव्ही आहे का, ते पाहायचे आहे असे बोलून घरात प्रवेश मिळविला. त्यानंतर घरातील 12 हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा 64 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –