नवरीचा फोटो काढण्यासाठी त्यांनी पर्स ठेवली अन् चोरट्यांनी केलं ‘असं’ काही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुलीच्या लग्नात फोटो काढताना पर्स बाजूला ठेवल्यानंतर चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला. यात सव्वा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. चतुश्रृंगी परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे लग्न होते. बाणेर रस्त्यावरील कुंदन गार्डनमध्ये विवाह सोहळा होता. आचार्‍याला पैसे देण्यासाठी त्यांनी सव्वा लाखाची रोकड आणली होती. ती पर्समध्ये ठेवली होती. त्यात मोबाईल व सोनसाखळी होती. दरम्यान, लग्न सोहळ्यानंतर फोटो शुट सुरू होते. यामुळे फिर्यादी या मुलीसोबत फोटो काढण्यास गेल्या. फोटोग्राफरने त्यांना बॅग खाली ठेवण्यास सांगितले. त्यांनी खांद्यावरील पिशवी बाजूला काढून ठेवली. नेमक्या त्याच संधीचा फायदा घेउन चोरट्याने महिलेची पिशवी चोरुन नेली. पर्समध्ये एकूण 1 लाख 17 हजारांचा ऐवज होता. अधिक तपास पोलीस हवालदार एम. सी. तारु करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like