दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करून लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहेच, पण रस्त्यावरील गुन्हेगारीही कमी झालेली नसून, दुचाकीस्वार तरुणाला अडवून त्याला मारहाण करत गळ्यातील चैन चोरल्याची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ परिसरात हा प्रकार घडला आहे.

नारायणलाल बिष्णोई (वय 24, रा. वडगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोन साखळी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणलाल यांचे मिठाई विक्रीचे दुकान आहे. रविवारी ते चुलत्यांकडे जेवण करण्यासाठी जात होते. त्यावेळी पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी त्यांना अडविले. चोरट्यांनी त्यांना मारहाण करुन गळ्यातील 30 हजारांची सोन्याची चेन चोरुन पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक के. एस. तनपुरे अधिक तपास करीत आहेत.

You might also like