प्रदर्शनात नाश्ता करताना छायाचित्रकाराचा लाखाचा कॅमेरा चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर येथील सिंचन भवन मैदानात कॉन्स्ट्रो इंटरनॅशनल ट्रेड एक्पो प्रदर्शनात नाश्ता करण्यासाठी गेलेल्या एका छायाचित्रकाराचा 1 लाख 10 हजारांचा कॅमेरा चोरीला गेला आहे.

याप्रकरणी सौरभ पांचाळ (वय 22, रा. सदाशिव पेठ) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ फोटोग्राफिचे शिक्षण घेत असून चार दिवसांपुर्वी शिवाजीनगर परिसरातील सिंचन भवन मैदानात कॉन्स्ट्रो इंटरनॅशनल ट्रेड एक्पो प्रदर्शनात फोटो काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी सौरभ एका स्टॉलजवळ नाष्टा करण्यासाठी थांबला असताना त्यांनी कॅमेऱ्याची बॅग जवळ काढून ठेवली. त्यावेळी चोरट्यांनी सौरभ यांची नजर चुकवित 1 लाख 10 हजार रुपयांचा कॅमेरा चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक के. पी. पाटील अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –