पुण्यात घरफोडीचे सत्र कायम, पुन्हा 3 फ्लॅट फोडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, पुन्हा चोरट्यांनी तीन बंद फ्लॅट फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. शहरात पोलिसांपेक्षा गुन्हेगारांचीच दहशत असल्याचे पाहिला मिळत आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात 70 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे शंकरशेठ रोडवरील मिरा हाऊसिंग सोसायटीत राहण्यास आहेत. दरम्यान, ते कामानिमित्त कुटूंबियासह 2 ते 5 जानेवारी या कालावधीत घराला कुलूप लावून गेले होते. त्यादरम्यान, चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील 3 लाख 58 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली. रविवारी ते परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीसांना माहिती दिली. स्वारगेट पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अधिक तपास स्वारगटे पोलीस करत आहेत.

तर, एरंडवणा परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून 3 लाखांचे दागिने तसेच 6 हजारांचे युएस डॉलर असा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी 74 वर्षीय सुभाष गुरव यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरव यांचा येथील नवसह्याद्री सोसायटीत सिंधुदुर्ग बंगला आहे. गुरव 2 ते 5 जानेवारीच्या कालावधीत बाहेर गेले होते. त्यादरम्यान, चोरट्यांनी त्यांचा फ्लॅट फोडला आहे. तिसरी घटना चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून 61 हजार रुपायांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/