बस प्रवासात 90 हजाराचे दागिने चोरीला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आई अन भावासोबत पीएमपीएल प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधून दागिने आणि मोबाईल असा 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा भाऊ तसेच आईसोबत पीएमपीएलने प्रवास करत होत्या. पुणे स्टेशन ते आंबेडकर उद्यानापर्यंत आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी फिर्यादींच्या आईच्या पर्समधून सोन्याचे दागिने, मोबाईल रोकड तब्बल 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारा पीएमपीएल बसमधील चोरट्यांचा धुमाकूळ काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/