Pune : 5 जणांच्या टोळक्याने मॅनेजरला घातक हत्यारांचा धाक दाखवून देशी दारूचे दुकान लुटले, नर्‍हे परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाच जणांच्या टोळक्याने रात्री मॅनेजरला घातक शस्त्र दाखवून देशी दारूचे दुकान लुटून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. नऱ्हे भागात हा प्रकार घडला आहे. फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण घडले आहे.

याप्रकरणी रमेश दौलतराव पाटील (वय 50) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे येथे पारी कंपनी चौकाजवळ सरकारमान्य पाटील यांचे देशी दारूचे दुकान आहे. अडीच महिन्यांपूर्वी (24 फेब्रुवारी) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पिट्या, हुक्या व त्याचे 3 साथीदार दुकानात शिरले. त्यांनी मॅनेजर शिवप्रकाश अग्रणी याला पालघर सारख्या लोखंडी हत्याराने मारण्याची भीती दाखवून शिवीगाळ केली. तर एकाने माझे नाव हुक्या आहे, गल्ल्यातील सर्व पैसे दे, नाहीतर मारून टाकीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर मॅनेजर शिवप्रकाश अग्रणी घाबरून गल्ल्यापासून दूर झाले. त्यावेळी एकाने गल्यात हात घालून अंदाजे 30 हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेत पलायन केले. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.