Pune : मध्यवस्ती असणार्‍या गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्यांकडून लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्तीमधील आणखी एका गणेश मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारत दानपेटी चोरून नेल्याचे समोर आले आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मंदिरातील चोरी सत्र काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी सागर पवार (वय 44) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फडके हौद चौकात म्हसोबा मित्र मंडळाचे गणेश मंदिर आहे. आतल्या दरवाजाचे बाहेर दान पेट्या ठेवल्या होत्या. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी 10 दिवसांपूर्वी पहाटेच्या (दि. 5 मे) सुमारास दानपेट्या फोडून चोरट्यानी त्यातील रक्कम चोरून नेली. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.