पुण्यातील कार्यालय फोडून 3 लाख लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम सुरूच असून, हडपसर परिसरातील एक ऑफिस फोडून चोरट्यांनी तब्बल तीन लाखांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. इकॉम एक्सप्रेसेचे कार्यालय फोडण्यात आले आहे.

याप्रकरणी अमोल पवार (वय 31, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील घुले वाईन्स शॉप शेजारी फिर्यादींचे इकॉम एक्सप्रेस लि. कंपनीचे ऑफिस आहे. च्याकडून वेगवेगळ्या वस्तूचीं डिलव्हरी केली जाते.

त्यासाठी काही मुले त्यांच्याकडे काम करतात. डिलव्हरीमधून आलेली रक्कम ऑफिसमधील कपाटात ठेवली जाते. दरम्यान, तीन दिवसांपुर्वी (दि. 23) ऑफिस बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी ऑफिसचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच, कपाटात ठेवलेले 3 लाख 714 रुपयांची रोकड चोरून नेली. दुसर्‍या दिवशी हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.