पीएमपी प्रवासात महिलेच्या हातातील बांगडी चोरीला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पीएमपीएल बसप्रवासात होणाऱ्या चोऱ्या अद्याप थांबलेल्या नसून, पुन्हा पीएमपी प्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील १ लाख ४५ हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरून नेली. कात्रजबस डेपो ते स्वारगेट प्रवासात ही घटना घडली.

याप्रकरणी ८३ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपुर्वी फिर्यादी महिला मैत्रिणीसह कोंढणपूर ते स्वारगेट पीएमपीएल बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी बस गोगलवाडी फाटा येथून जात असताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील १ लाख ४५ हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. बसमधून खाली उतल्यानंतर चोरी झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलीस हवालदार पाटील अधिक तपास करीत आहेत.

You might also like