PMPML प्रवासात पुन्हा ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरली

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पीएमपीएल प्रवासातील चोर्‍या सुरूच असून, पुन्हा एखदा ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी पीएमपी प्रवासात चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. धायरी ते स्वारगेट प्रवासादरम्यान हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 80 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या धायरीतील रायकरमळा येथे राहण्यास आहेत. दरम्यान, कामानिमित्त त्यांना स्वारगेट परिसरात यायचे होते. त्यामुळे त्यांनी धायरी मारूती मंदिर बस स्टॉप येथून पीएमपी बस पकडली. बसमध्ये मोठी गर्दी होती. त्या स्वारगेट परिसरात आल्यानंतर बसमधून खाली उतरल्या. मात्र, या प्रवासात त्यांच्या हातातील 45 हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी खडक पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.