PMPML प्रवासात पुन्हा सोन्याची बांगडी चोरली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात पीएमपीएल बस प्रवासादरम्यान चोर्‍यांचे सत्र कायम असून, पुन्हा एका ज्येष्ठ महिलेला लक्ष्य करून त्यांच्या हातातील बांगडी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी शनिवार पेठेतील 56 वर्षीय जेष्ठ महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गृहिणी आहेत. कामानिमित्त त्या विमानतळ परिसरात गेल्या होत्या. तेथून त्या 509 चौकातून महानगरपालिकेकडे जाणार्‍या बसमध्ये प्रवेश करीत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या हातातील 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरुन नेली. बसमधून उतरल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक ए. आर. गांधले करत आहेत.