पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याचे सत्र कायम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात मध्यरात्रीची लुटमार अन् दिवसा पीएमपीएमएल प्रवासात चोरट्यांनी सुरू केलेला धुमाकूळ काही केल्या थांबत नसून, टिळक रस्त्यावर प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेच्या हातातील 58 हजाराची बांगडी चोरून नेल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सदाशिव पेठेतील ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला गेल्या आठवड्यात शिवाजीनगर ते टिळक रस्ता दरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेजवळ असलेल्या थांब्यावर त्या उतरल्या. तेव्हा ज्येष्ठ महिलेच्या हातातील बांगडी लांबविण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे महिला घाबरून गेली होती. त्यांनी कुटूंबियांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –